Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मंत्रीही व्हॉटस्अॅप चॅनेलवर; जनतेला मिळणार निर्णय

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मंत्रीही व्हॉटस्अॅप चॅनेलवर; जनतेला मिळणार निर्णयमुंबई : खरा पंचनामा

व्हॉटस्अॅपचे नवीन ऑप्शन व्हॉटस्अॅप चॅनेलचा वापर आता महाराष्ट्रातील मंत्र्यांकडूनही सुरू करण्यात आला आहे. एक्स (ट्विटर), इन्स्टाग्रामप्रमाणेच आता व्हॉटस्अॅपवरून थेट जनतेपर्यंत पोहोचता येणार आहे. 

याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्य व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून अन्य मंत्र्यांकडूनही हे चॅनेल सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

ट्विटर, इन्स्टाच्या धर्तीवर व्हॉटस्अॅपचे नवे ऑप्शन आता मोबाइलवर उपलब्ध झाले आहे. मंत्रीही या ऑप्शनद्वारे व्हॉटस्अॅपवर उपलब्ध झाल्याने त्यांना व्हॉटस्अॅपवर फॉलो केल्यावर त्या-त्या मंत्र्यांनी आपापल्या खात्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि संबंधित बातम्या आपल्याला पाहता येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी 'सीएमओ महाराष्ट्र' या व्हॉटस्अॅप चॅनेलचा श्रीगणेश केला सुरू असून चॅनेल केले 'असून ४० हजार फॉलोअर्स लाभले आहेत. 'Find channels' मध्ये 'CMO Maharashtra' हे टाइप केल्यावर चॅनेलच्या यादीमध्ये हे चॅनेल दिसणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.