Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

100 दिवसानंतर सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर पहिली टीका!

100 दिवसानंतर सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर पहिली टीका!



मुंबई : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावलेले पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सुप्रिया सुळेंची ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवर संघाबाबत यशवंतराव चव्हाण यांचं मत काय होतं याबाबत यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलेले मत ट्विट केले आहे.

सरकारमध्ये शंभर दिवस पूर्ण झाल्यानं अजित पवार यांनी जनतेसाठी पत्र लिहलंय. पत्रात त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलाय. पत्रात यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख केला आहे. शरद पवार यांनी होर्डिंग अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये, असं सुनावलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर झळकले आहेत. या सर्व प्रकारानंतर सुप्रिया सुळेंनी आरएसएसबाबत यशवंतराव चव्हाणांचे काय मत होते हे ट्विट करत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांवर टीका केली आहे. आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्यांच्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, असे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

मी समजलो की (डॉक्टर हेडगेवार) यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्यांच्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो, असे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

एकीकडे यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यायचं आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण यांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्यासोबत जायचं हा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.