नांदेड, औरंगाबादनंतर आता नागपूर हादरलं, 48 तासात 25 रुग्णांचा मृत्यू!
नागपूर : खरा पंचनामा
नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातील घटनेनंतर आता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील आकडे तपासता गेल्या 24 तासांत 25 रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय.
यात 16 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर 9 रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातले आहेत. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात या रुग्णांना हलवण्यात आलं. दरम्यान खासगी रुग्णालय रुग्णांची स्थिती बघून त्यांना अॅडमिट करून घेतात, तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावं लागतं त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचं म्हणणं आहे.
खासगी रुग्णालय आपल्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवयस्थ अवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवतात. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 8 ते इंदिरा गांधी शासकीय महाविद्यात चार रुग्ण आले. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थित बघून अॅडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावे लागते त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाचे म्हणणे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.