Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एडक्याच्या हल्ल्यात जखमी चहा टपरी चालकाचा मृत्यू! दोघांना अटक, खुनाचा गुन्हा होणार दाखल

एडक्याच्या हल्ल्यात जखमी चहा टपरी चालकाचा मृत्यू!
दोघांना अटक, खुनाचा गुन्हा होणार दाखल



सांगली : खरा पंचनामा

संजयनगर परिसरातील रेल्वे पुलावळील टपरी चालकावर एडक्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो टपरी चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांवर खुनाचा गुन्हा लवकरच दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. 

सत्यजित ऊर्फ गबऱ्या नामदेव माने (वय ३०, रा. रामरहीम कॅलनी), करण विजय परदेशी (वय १९, रा. जगदाळे प्लॅट, संजयनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजेंद्र रामचंद्र नाईक (वय ३७, रा. शिंदे मळा) असे मृत टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरा दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर माने आणि परदेशी या दोन्ही संशयितांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. 

जखमी नाईक याची चहाची टपरी आहे. संशयित रविवारी सायंकाळी त्याच्याकडे आले. त्यांच्यात पैशांवरून जोरदार वादावादी झाली. वाट टोकाला गेल्यानंतर संशयितांनी एडक्या सारख्या हत्याराने नाईक याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या पायाला गंभीर जखम झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना नाईक याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी नाईक याच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.