Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील गोवा सीमांवरील एक्साईजचा बंदोबस्त वाढवा ना. शंभूराज देसाई यांची अधिकाऱ्यांना सूचना; प्रभात हेटकाळे, समीर पठाण यांच्या निवेदनाची दखल

राज्यातील गोवा सीमांवरील एक्साईजचा बंदोबस्त वाढवा
ना. शंभूराज देसाई यांची अधिकाऱ्यांना सूचना; प्रभात हेटकाळे, समीर पठाण यांच्या निवेदनाची दखल



कोल्हापूर : खरा पंचनामा

साताऱ्यात नुकतेच दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या रस्त्यांवरील तपासणी नाक्यांवर बंदोबस्त वाढवा. भरारी पथकांची गस्तही वाढवा अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली. गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीबाबत सत्यमेव जयते संघटनेचे प्रभात हेटकाळे, समीर पठाण यांनी मंगळवारी कोल्हापुरात ना. देसाई यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत ना. देसाई यांनी या सूचना दिल्या. 

ना. शंभूराज देसाई मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यापूर्वी हेटकाळे आणि पठाण यांनी त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सातारा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पाटण तालुक्यात दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड केली आहे. हा विभाग राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात आहे. साताऱ्यातील राज्य उत्पादन शुल्कचे विभागाने ही चांगली कारवाई केली आहे. मात्र यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच गोवा बनावटीची दारू सातारा जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. 

गोवा सीमेवर सिंधुदुर्ग येथे राज्य उत्पादन शुल्कचा तपासणी नाका आहे. शिवाय तेथे भरारी पथकही कार्यरत आहे. तरीही सिंधुदुर्ग येथील राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, कमर्चार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असतानाही सिंधुदुर्ग येथील अधिकारी, कर्मचारी काय करतात असा प्रश्न आहे. गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीमुळे महाराष्ट्राच्या महसूलावर परिणाम होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षाने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे अधीक्षक आणि भरारी पथकाचे निरीक्षक यांची या प्रकरणात उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी गोवा सीमेवरील सर्व तपासणी नाक्यांवर बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय स्थानिक भरारी पथकासह राज्याच्या भरारी पथकालाही सीमा भागात विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही ना. देसाई यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूरचे अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक आर. एल. खोत आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.