सांगलीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा!
४३ जणांचा समावेश; उपाधीक्षक जाधव यांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर रस्त्यावरील हरिप्रसाद इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल छापा टाकला. अड्डा चालवणाऱ्यांसह जुगार खेळणाऱ्या ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
त्यात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जुगार, मटक्यासह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. काल दुपारी पथक गस्तीवर होते. त्यावेळी कोल्हापूर रस्त्यावरील गोपाळ पवार यांच्या मालकीच्या हरिप्रसाद इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने काल दुपारी सव्वाचारच्या सुमारास छापा टाकला. ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई करण्यात आलेल्यामध्ये संशयित महम्मद हनिफ जमादार (यशवंतनगर), संजय खंडागळे (शंभर फुटी रस्ता), प्रदीप मदने (सिद्धार्थनगर नांद्रे), यासीन मुल्ला (पाटणे प्लॉट, सांगली), आल्ताफ मुजावर (मारूती रस्ता), जब्बारभाई मणेर (रा. मंगळवार पेठ, मिरज), पंडित रसाळे (रा. मांजरी, ता. चिक्कोडी, कर्नाटक), शकील कोतवाल (नागारजी गल्ली), मनोहर पवार (दक्षिण शिवाजीनगर), मनोज पाटील (शिरोळ), राजेश शेलार (जामवाडी), संजय नाईक (शामरावनगर), उमर मन्सुर (जयसिंगपूर), गणेश कांबळे (पाटणे प्लॉट), प्रमोद वाघमारे (शाम हौसिंग सोसायटी, सांगली), प्रकाश माने (मिरज), वासुदेव पारस (जमखंडी, कर्नाटक), मुसा मिरा तेरदाळ (तेरदाळ, कर्नाटक), दस्तगीर लतीफ (कवठेमहांकाळ), रघुनात दींडे (कवठेमहांकाळ), नासीर जमादार (कुपवाड रोड), प्रशांत पवार (कवठेपिरान), सुरेश शिंपी (शामरावनगर, सांगली), उदयसिंह जाधव, प्रकाश पाटील (दोघे रा. कवटेपिरान), उस्मान मगदुम (खणभाग, सांगली), भारत मोगलाडे (रा. जयसिंगपूर), वाहीद नाईकवडी (हरिपूर रस्ता), राजु मोगलाडे (नांदणी, शिरोळ), रफीक जमादार (यशवंतनगर, सांगली), गुलाब शेख (खणभाग, सांगली), समशेर पेंढारी (जयसिंगपूर), शब्बीर जमादार (रा. कवठेपिरान), विनायक पाटील (जयसिंगपूर), धोंडिराम तावदरकर (पंचमुखी मारूती रस्ता, सांगली), रणजीत सूर्यवंशी (रा. मिरज), नजीर मुजावर (रा. कवठेमहांकाळ), विराप्पा कल्लोळी (रा. माळवाडी), झाकीर जमादार (रा. यशवंतनगर, सांगली), महावीर चव्हाण (५१), अनिल माळगाळे (दोघे रा. उमळवाड, शिरोळ), पोपट आवळे (रा. बेडग), मुदसर मिस्त्री (रा. फौजदार गल्ली, सांगली) यांचा त्यात समावेश आहेत.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे अंमलदार शिवाजी ठोकळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ च्या कलम ४ आणि ५ प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
उपनिरीक्षक महादेव पोवार अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.