Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विमान अपघात प्रकरणात 'रेडबर्ड'वर निलंबनाची कारवाई

विमान अपघात प्रकरणात 'रेडबर्ड'वर निलंबनाची कारवाई



पुणे : खरा पंचनामा

वारंवार होणाऱ्या विमान अपघातांची गंभीर दखल घेत रेडबर्ड एव्हिएशनवर कारवाई करण्यात आली आहे. कामकाज निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या पंधार दिवसांत दोन विमान अपघात झाले आहेत. त्यामुळे ही ट्रेनिंग अकॅडमी चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

बारामती विमानतळावरील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी या वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे देशभरातील कामकाज तात्काळ निलंबित करा असे आदेश सिव्हील एव्हिएशनचे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत. टेक्नम पी 2008 जे या विमानाचा अपघात झाल्याची नोंद घेत डीजीसीएनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात कंपनीला ईमेल पाठवून तातडीने कामकाज निलंबित करत असल्याचं म्हटलं आहे.

या इमेलमध्ये म्हटलं आहे की, रेडबर्ड या अकॅडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती यामुळे हे अपघात घडले आहेत. डीजीसीए आपल्या संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार देखील तपासले जाणार आहेत. या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत देशातील सर्व ठिकाणचे पायलट प्रशिक्षण कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत आहे.

बारामतीत गेल्या चार दिवसांत रेडबर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले होते. सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या अपघातानंतर विमानतळ परिसरातील उद्योजकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.