फुकट दारूसाठी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याचा हॉटेलात धिंगाणा
पुणे : खरा पंचनामा
दारू न दिल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने पुण्यातील हॉटेलमध्ये धिंगाणा घालत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला.
हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. या कर्मचाऱ्यावर आता कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विकास आबने असे गोंधळ घालणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री हॉटेल बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले. आपण उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे दारूची मागणी केली. यावर कर्मचाऱ्याने हॉटेल बंद झाले असून आता देता येणार नाही असे सांगितले. यामुळे संतापलेल्या संबंधित अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.