Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून सांगलीतील घटना; संशयित झाला पसार

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
सांगलीतील घटना; संशयित झाला पसारसांगली : खरा पंचनामा

आईकडे रहात असलेल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून चाकूने सपासप वार करून पतीने खून केला. गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वानलेसवाडी येथील रावसाहेब माळी मळा येथे ही घटना घडली. या घटनेनंतर संशयित पती पसार झाला आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

शिल्पा सिदाप्पा कटीमणी (वय २५, रा. कक्केरी, जि. यातगिरी, कर्नाटक) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय ३०, रा. कक्केरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत शिल्पाची आई मंजुळा ऊर्फ लक्ष्मीबाई शिवरूद्र दोड्डमणी (वय ४५, मूळ रा. शिरपूर, कर्नाटक, सध्या रा. वानलेसवाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. 

कटीमणी दाम्पत्य मजूर म्हणून काम करते. तर शिल्पाची आई वॉचमन म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी कटीमणी दाम्पत्य सांगलीत रहाण्यासाठी आले होते. मृत शिल्पा आईजवळ रहात होती. तर तिचा पती सिदाप्पा कर्नाटकात गावी रहात होता. गुरुवारी रात्री तो मंजुळा दोड्डमणी यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी शिल्पाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर त्याने खिशातील चाकू काढून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. शिल्पा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तेथून पसार झाला. 

याबाबत रात्री उशीरा मंजुळा यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विश्रामबागचे प्रभारी निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस संशयित सिदाप्पा याचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.