ईडीने सबळ पुरावे द्यावेत, अन्यथा खटला टिकणे अशक्य!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सुनावणी झाली. या प्रकरणात सिसोदिया यांची पैशांच्या देवाण-घेवाणीत भूमिका नसल्यास त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोपी का बनवले जात आहे, अशी विचारणा न्यायालयाने ईडीला केली.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी तपास संस्थेला या प्रकरणाचे काही पुरावे आहेत का, असाही प्रश्न केला. त्याचबरोबर देवाण-घेवाणीला दोन्ही बाजूंनी सिद्ध करावे लागेल. लिकर लॉबीकडून पैसा आरोपींपर्यंत कसा पोहोचला, याचे पुरावे तपास संस्थेने द्यावेत. खटल्यात सर्वकाही पुराव्यांवर आधारित असले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आता सिसोदियांच्या जामीन याचिकेवर १२ ऑक्टोबरला सुनावणी करेल.
ईडीने मद्य घोटाळ्यात अटक आप खासदार संजय सिंह यांना राउज अॅव्हेन्यू कोर्टात हजर करून १० दिवसांच्या रिमांडची मागणी केली. सिंह यांच्या घरासह २३९ ठिकाणी झडती झाली. दिनेश अरोराच्या कर्मचाऱ्याने संजय सिंह यांच्या घरी २ कोटी रोख दिल्याचा आरोप केला. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून सिंह यांना पाच दिवसांची रिमांड दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.