Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वायर कुणी तोडली रे, कोण घुसलं माझ्या मेळाव्यात? पंकजा मुंडे संतापल्या अन् ...

वायर कुणी तोडली रे, कोण घुसलं माझ्या मेळाव्यात? 
पंकजा मुंडे संतापल्या अन् ...



बीड : खरा पंचनामा

वायर कुणी तोडली रे, काय प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय का? आवाज कुणाचा? कोणी दाबला माझा दाबा, कोण घुसलं माझ्या मेळाव्यात, हळूच कोणीतरी वायर बंद केल्याचं दिसतंय. पण माझा आवाज आता कुणी दाबू शकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अचानक माईक बंद झाल्यामुळे तुफान टोलेबाजी केली.

आज बीडमध्ये सावरगावात भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा विराट असा लोकसंख्येत पार पडत आहे. पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्यात तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे पंकजांनी आपल्या स्टाईलमध्ये सर्वांना समाजून सांगितलं. पण भाषण सुरू होत नाही तेच पंकजांचा माईक बंद झाला.

मात्र, भाषणादरम्यान मध्येच माईक बंद झाला. आवाज येईना, तेव्हा कुणी कापली माझी वायर असं पंकजा मुंडेंनी विचारलं. वायर कुणी तोडली रे माझी, काय प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय का? आवाज कुणाचा? कोणी दाबला माझा दाबा, कोण घुसलं माझ्या मेळाव्यात हळूच कोणीतरी वायर / बंद केल्याचं दिसतंय. पण माझा आवाज आता कुणी दाबू शकणार नाही, असं म्हणत पंकजांनी तुफान टोलेबाजी केली.

'तुम्ही सर्वजण राज्याच्या प्रत्येक विभागातून जिल्ह्यातून इथे आलात. माझ्या दसऱ्याच्या माझ्या परंपरेच्या कार्यक्रमात आलात, मी नतमस्तक होऊन स्वागत करते, तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा. आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे, असं म्हणत भगवान बाबा की जय अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझं जे स्वागत केलं, सकल मराठा समाजाच्या लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं. उसतोड मजुरांनीही स्वागत केलं. हे स्वागत तेवढंच मोलाचं आहे जे तुम्ही उन्हातान्हात कार्यक्रमासाठी आलात. मला कुठलं पद मिळालं, कुठली खुर्ची मिळाली म्हणून आलात का? माझ्यासाठी आला का? मी तुम्हाला काय दिलंय? असं विचारताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.