Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांना विशेष न्यायालयाचा दणका

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : छगन भुजबळांना विशेष न्यायालयाचा दणका



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा आरोपमुक्त करण्याचा अर्ज शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला. त्याशिवाय भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ व पुतणे समीर भुजबळ यांनाही न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

महाराष्ट्र सदन बांधकामाशी संबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला खटला रद्द करा, अशी मागणी करणारे छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ व अन्य चौघांचे अर्ज फेटाळून न्यायालयाने भुजबळांना मोठा दणका दिला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सखोल तपासाचे निर्देश दिले होते. त्या तपासाच्या आधारे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ व इतरांविरुद्ध तीन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले. त्यानंतर त्याच आधारावर आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवला गेला. ईडीने दाखल केलेला हा खटला रद्द करण्याची विनंती करीत पंकज व समीर भुजबळ यांच्यासह संजय जोशी, तन्वीर शेख, सत्येन केसरकर व राजेश धारप यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात दाद मागितली होती.

एसीबीने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यात भुजबळ कुटुंबियांना 'क्लीन चिट' मिळाल्यानंतर त्यांनी विशेष न्यायालयात आरोपामुक्ततेसाठी अर्ज केला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.