Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिक्षक अधिवेशनात घुसले मराठा आंदोलक; केसरकरांनी धसका घेत दौरा केला रद्द

शिक्षक अधिवेशनात घुसले मराठा आंदोलक; केसरकरांनी धसका घेत दौरा केला रद्दअहमदनगर : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्यस्तरीय महामंडळ सभा आणि नगर जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन नगरमध्ये आज (रविवारी) होत आहे. या अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे येणार आहेत.

राजकीय नेते येणार असल्याची माहिती मिळताच या अधिवेशनामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी घुसले. जोरदार घोषणाबाजी करत व्यासपीठाचा ताबा घेतला. यामुळे गोंधळ उडाला.

पोलिसांनीही व्यासपीठाकडे धाव घेतली. व्यासपीठामागील फलक उतरवल्यानंतर मराठा समाजाचे पदाधिकारी शांत झाले. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नगर दौरा रद्द केल्याची माहिती दिली. याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली नाही.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्यस्तरीय महामंडळ सभा नगरमध्ये होत आहे. अधिवेशनाला राज्यातले तीन मंत्री येणार होते. अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन पेटले आहे. आंदोलन आक्रमक आहेत. त्यामुळे या अधिवेशनावर मराठा आरक्षण मराठा आंदोलकांचे काय पडसाद उमटतात याकडेही लक्ष लागले होते.

मराठा आंदोलन हे आक्रमक होते. व्यासपीठावरील फलक काढून टाका, अशी मागणी करत होते. हे मंत्री काहीच कामाचे नाही, असे सुनावत होते. शेवटी काही आंदोलकांनी फलकाकडे धाव घेतली. फलक ओढायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना रोखले. परंतु शिक्षक नेत्यांनी समंजस भूमिका घेतली. फलक काढून टाकत आहोत, असे आंदोलकांना सांगितले. यानंतर आंदोलकांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्या, अशी मागणी केली. तरच अधिवेशन पुढे चालू ठेवा, असे सुनावले. यावर व्यासपीठावरील शिक्षक नेत्यांनी मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यानंतर आंदोलक शांत होत घोषणाबाजी करत मागे फिरले. अधिवेशनाच्या व्यासपीठावरील फलक देखील यावेळी उतरवण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.