मराठा आरक्षणासाठी सांगलीत कॅंडल मार्च
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी आयोजन
सांगली : खरा पंचनामा
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली 40 वर्ष प्रलंबीत ठेवत या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजासोबत विश्वासघात केला असून मराठा समाजाचे शासकीय सेवा व शिक्षणातील प्रतिनिधित्व नाकारण्याचे काम करण्यात आले आहे याचा मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी गुरुवारी रात्री मराठा समाजातर्फे सांगलीत कॅंडल मार्च काढण्यात आला. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या वतीने 17 सप्टेंबर 2023 रोजी भव्य मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती. यानंतर 14 ऑक्टोबरला सराटी येथे राज्यभरातील मराठा समाजाने एकत्र येत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात ओबीसीत आरक्षणाची मागणी केली होती. मात्र राज्यातील सताधारी असतील किंवा विरोधक असतील हे मराठा आरक्षण देण्यास विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. जरांगे यांनी राज्य शासनाला ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र या वेळेत शासनाने आरक्षण न दिल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्याच्या समर्थनार्थ आज मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नाही तर मराठा समाज हा संघर्ष तीव्र करण्या बरोबर कायद्याची लढाई पूर्ण क्षमतेने लढली जाईल असा इशारा मराठा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला.
यामध्ये सतीश साखळकर, जयराज बर्गे, संजय पाटील, रमेश जाधव, चेतक खंबाळे, राहुल पाटील, राहूल जाधव, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, योगेश पाटील, अमित चव्हाण, सुभाष पाटील, बजरंग यादव, कपील जाधव, धनाजी पाटील, स्वप्नील कदम, सचिन कदम, सौ आशा पाटील, राणी यादव, भक्ती चव्हाण यांच्यासह समाज बांधव, भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.