Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

करसगी येथे उसाच्या शेतातील ७८ किलो गांजा जप्त उमदी पोलिसांची कारवाई

करसगी येथे उसाच्या शेतातील ७८ किलो गांजा जप्त
उमदी पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

जत तालुक्यातील करसगी येथे बंजाळ वस्ती येथे उसाच्या शेतात लागवड केलेली गांजाची ७८ किलोची झाले जप्त करण्यात आली. बाजारभावानुसार त्याची किंमत ७ लाख ८० हजार रूपये आहे. याप्रकरणी एकाला अटक केल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. 

बिराप्पा जानप्पा हंजगी (वय ४३, रा. बंजाळ वस्ती, करसगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. उमदी परिसरात गांजाची लागवड, तस्करी, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक श्री. शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. मंगळवारी करसगी येथील बंजाळ वस्ती येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती श्री. शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह तेथे छापा टाकला.  

त्यावेळी उसाच्या शेताजवळ एकजण थांबला होता. त्या शेतात पथकाने तपासणी केल्यानंतर तेथे गांजाची लागवड केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शेताचा मालक बिराप्पा हंजगी याला अटक करून शेतातील गांजाची सर्व झाडे जप्त करण्यात आली. त्याचे वजन ७८ किलो इतके भरले. बाजारभावानुसार त्याची किंमत ७ लाख ८० हजार रूपये आहे. याप्रकरणी हंजगी याच्याविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, मनिष कुमरे, इंद्रजित गोदे, महेश स्वामी, आप्पा घोडके, नितीन खोंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.