पोलीस उप-मुख्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी उपलब्ध करणार : पवार
बारामती : खरा पंचनामा
पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील टप्पा क्रमांक दोनच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील बांधकामाची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. त्यावेळी ते बोलत होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताहचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील परिसरात तसेच कन्हेरी वन उद्यान येथे वृक्षारोपणही करण्यात आले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामती परिसरातील कन्हेरी वन उद्यानातील मुलांचा मनोरंजन पार्क, झुलता पूल, बोटिंग घाट, अॅम्पी थिएटर, तलाव, गोजुबावी येथील नियोजित श्वान पथक कार्यालयाची जागा, पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथील बांधकाम, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा, कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, परकाळे बंगला येथील कालव्यावरील पूल आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन बहुउद्देशीय हॉलचे काम आदी ठिकाणी सुरू असलेली विविध विकास कामांची पाहणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.