Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अब्दुल सत्तार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी अक्षरश: हुसकावून लावलं!

अब्दुल सत्तार यांना गावबंदी, गावकऱ्यांनी अक्षरश: हुसकावून लावलं!



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरक्षणासाठी थेट सरकारलाच धारेवर धरलं आहे. जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका अनेक पुढाऱ्यांना बसला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनाही गावबंदी करण्यात आली आहे. पण ही गावबंदी मराठा आरक्षणासाठी झाली नाही. तर वेगळ्याच कारणासाठी झाली आहे. गावकऱ्यांनी सत्तार यांना अक्षरश: गावातून हुसकावून लावले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. पोरांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी 'अब्दुल सत्तार चले जाव'च्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्यामागे धावत होते. गावकऱ्यांचं हे उग्र रुप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला.

या गावातील लोकांनी सत्तार यांना गावात येऊ दिलं नाही. चले जावच्या घोषणा दिल्या. त्यांना अक्षरश: पिटाळून लावलं. त्याला कारणही तसंच घडलं आहे. या गावात काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा काही ग्रामस्थांचा आरोप आहे. त्या रागातून सत्तारांना गावात येण्यापासू रोखण्यात आल्याचं सांगितलं जातं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.