Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एन्काऊंटरच्या नावाखाली काही पोलीस अधिकारी गुन्हेगारांना संपवतात मीरा बोरवणकरांचा मोठा खुलासा

एन्काऊंटरच्या नावाखाली काही पोलीस अधिकारी गुन्हेगारांना संपवतात
मीरा बोरवणकरांचा मोठा खुलासामुंबई : खरा पंचनामा

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येरवडा तुरुग परिसरातील भूखंडावरून राजकीय नेत्यांवर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'मुंबईत काही पोलीस अधिकारी असे आहेत, जे एन्काऊंटरच्या नावाखाली गुन्हेगारांना ठार करत. असे करण्यासाठी या पोलिस अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात असे', असा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला आहे. तसेच, 'मी महिला असल्याने माझ्याशी बोलण्यात काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट अवघडत होते. मॅडम महिला आहेत. त्यांना सर्वच कसे सांगायचे', असा त्यांचा अवघडलेपणा होता, असेही बोरवणकर म्हणाल्या.

मीरा बोरवणकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांबाबत धक्कादायक खुलासे केले. मीरा बोरवणकर यांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस दलात मला 'जॉईट सीपी क्राइम' या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्यावर एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांना नियंत्रणात आणण्याची जबाबदारी होती. मला एन्काऊंटरचा शॉर्टकर्ट पसंत नव्हता. पण, यामुळे मी माझे महिन्याचे एक कोटीचे नुकसान करुन घेत आहे, असे त्यावेळी दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले होते. तसेच, काही अधिकारी त्यावेळी राजकीय दबावामुळे थंड डोक्याने एन्काऊंटर करु लागले होते. मी जेव्हा ते पद स्वीकारले तेव्हा हसीना पारकर, विकी मल्होत्रा ही एक-दोन प्रकरणे सोडली तर मला बराच पाठिंबा मिळाला.

याशिवाय, "काही अधिकारी एन्काऊंटरचे समर्थन करताना सांगत की आम्ही संबंधित गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला नाही तर ते गुन्हेगार इतर काही लोकांना ठार करतील. तेव्हा त्यांचा मुद्दा मला पटत होता. त्यामुळे मी त्यांना पूर्ण नियंत्रणात ठेवू शकले नाही, पण 90 ते 95 टक्के अधिकारी माझ्या बाजूने होते. मी महिला असल्याने माझ्याशी बोलण्यात काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट अवघडत होते. मॅडम महिला आहेत. त्यांना सर्वच कसे सांगायचे, असा त्यांचा अवघडलेपणा होता", असेही मीरा बोरवणकर म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.