सुप्रीम कोर्टातील कागदपत्रे आमच्यासमोर सादर करा : नार्वेकरांचे दोन्ही गटांना आदेश
मुंबई : खरा पंचनामा
ठाकरे गट आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आमच्यासमोर सादर करावीत, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि. २०) शिवसेनेच्या दोन्ही गटांना दिले.
शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी सुनावणी आज नार्वेकर यांच्यासमोर झाली. दोन्ही गटांतील आमदारांना २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असून पुढील सुनावणी २६ ऑक्टोबररोजी होणार आहे.
यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रे ग्राह धरण्याची केलेली मागणी अध्यक्षांनी मान्य केली. या सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाने शिवसेनेच्या आमदारांना ईमेलद्वारे बजावलेला व्हिप आम्हाला मिळालेला नाही, असे शिंदे गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ३४ वेगवेगळ्या याचिका एकत्रित करून ६ याचिकेतच सादर केल्या जाणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.