Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेत्याची निर्घृण हत्या

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेत्याची निर्घृण हत्याबस्तर : खरा पंचनामा

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज छत्तीसगडच्या दुर्गमध्ये प्रचार सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची एकीकडे सभा झाली असताना दुसरीकडे भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे. आणि या मतदानाच्या फक्त तीन दिवस आधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच भाजप नेते रतन दुबे यांची हत्या करण्यात आली आहे. रतन दुबे हे भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. कौशलनारमध्ये भर बाजारात त्यांची हत्या करण्यात आली. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण नक्षलवाद्यांनी रतन दुबे यांची हत्या केल्याचा संशय आहे.

छत्तीसगडच्या बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रतन दुबे यांची हत्या झाल्याची माहिती पी. सुंदरराज यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांनी दुबे यांची हत्या केली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नकार दिला नाही. घटनास्थळी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे. तसंच हत्येत नक्षलवाद्यांचा हात आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल, असं पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.