Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दसऱ्या मेळाव्यास जाताना जखमी झालेल्या शिवसैनिकाचा उपचारावेळी मृत्यू

दसऱ्या मेळाव्यास जाताना जखमी झालेल्या शिवसैनिकाचा उपचारावेळी मृत्यूसांगली : खरा पंचनामा

मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अपघातात जखमी झालेले ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष लिंगाप्पा कुनुरे (वय ६०, रा. हिंगणगाव) यांची मृत्यूशी झुंज रविवारी थांबली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिरढोण गावाजवळ दि. २४ ऑक्टोबर रोजी शिवसैनिकांच्या गाडीला दुधाच्या टँकरने धडक दिली. या अपघातात विवेक तेली हे जागेवरच ठार झाले होते, तर संदीप शिंत्रे, प्रसाद सूर्यवंशी, सुभाष कुनुरे, महेश देसाई हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

जखमींपैकी सुभाष कुनुरे यांच्यावर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवार, दि. २६ रोजी उपचार सुरू असताना ३३व्या दिवशी कुनुरे यांची प्राणज्योत मालवली. मृत कुनुरे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.