Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इसिस दहशतवाद्यांना अटक; एनआयए प्रमुखांकडून पुण्याचे डीसीपी शर्मा यांचे कौतुक!

इसिस दहशतवाद्यांना अटक; एनआयए प्रमुखांकडून पुण्याचे डीसीपी शर्मा यांचे कौतुक!



पुणे : खरा पंचनामा

वर्षभर फरार असलेल्या आणि एनआयएने ज्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस लावले होते. अशा इसिसच्या दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी पकडून मोठी कामगीरी बजावली आहे. या कामगीरीमुळे देशभरातील दहशतवाद्यांच्या कारवाया व स्लिपर सेलचे जाळे उकलण्यास मदत होणार असून, ही महत्वाची कामगीरी केल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने पुणे पोलिसांच्याचे कौतुक केले आहे.

एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पोलिस आयुक्त रितेशकुमार आणि पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांना पत्र लिहून अभिनंदन केले आहे.

युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांना एनआयएने फरार घोषीत केले असल्याचे व त्यांच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे निष्पन्न झाले होते. कोथरूड पोलिसांनी वाहनचोरी करताना तिघांना पकडले असता त्यांची घरझडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना त्यांच्यातील मोहम्मद शाहनवाज आलम हा पळून गेला होता. त्यानंतर एनआयएने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.

त्यामध्ये पुण्यासह महाराष्ट्र व देशातील इतर शहरात असलेल्या इसिसच्या स्पिलर सेलचा शोध घेणे एनआयएला शक्य झाले. यातूनच पुण्यातील डॉ. अदनान सरकार व त्यांच्या नातेवाइकांपर्यंत एनआयए पोहचू शकले होते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या या दहशतवाद्यांमुळे त्यांच्या इतरही ठीकाणांची पाळेमुळे खणून काढण्यास एनआयएला मोठीच मदत झाली.

त्यामुळे दहशतवाद्यांच्या देशभरातील संभाव्य कारवायांना आळा घालण्यास यश आले आहे. दहशतवाद्यांचे स्पिलर सेल सध्या कसे आणि कोणकोमत्या भागात कार्यरत आहेत, त्यांचे ब्रेनवॉशिंग नेमके कसे केले जात आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरील माहिती एनआयएला मिळणे आता शक्य झाले आहे. एनआयएचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे हे सर्व शक्य झाले असा कौतुकास्पद उल्लेख पत्रात करुन खास कौतुक केले . पुणे पोलिसांच्या उल्लेखनीय कामामुळे देशातील दहशतवादी कारवाया व गुन्हे रोखणे शक्य झाले असल्याचेही म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.