Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जाट आणि मराठा एकत्र! संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची स्थापना

जाट आणि मराठा एकत्र!
संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची स्थापना



नवी दिल्ली : खरा पंचनामा

अखिल भारतीय जाट महासभेचे संमेलन आज येथील तालकटोरा स्टेडियममध्ये संपन्न झाले. विशेष म्हणजे या संमेलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाला आमंत्रित केले होते. यावेळी जाट आणि मराठा यांनी एकत्र येत आरक्षणासाठी जाट-मराठा संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची स्थापना केली.

जाट महासभेचे महासचिव युद्धवीरसिंग यांच्या पुढाकाराने झालेल्या संमेलनात मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, महासचिव संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानावटे, मराठा नेता राजेश निंबाळकर आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ. संजीव बालियान, खासदार वीरेंद्र सिंह यांच्यासह जाट समाजातील अनेक मंत्री व आमदार या संमेलनाला उपस्थित होते. दिलीप जगताप यांनी सांगितले की, जाट आणि मराठा यांच्या रक्ताचे आणि घामाचे या देशाच्या भूमि मध्ये सिंचन झाले आहे.

क्षत्रिय या नात्याने आम्ही रक्त सांडले तर शेतकरी या नात्याने घाम गाळला आहे. आज शेतकरी असलेल्या जाट आणि मराठा यांच्या भावी पिढ्यांचे भवितव्य अनिश्चित आहे. यासाठी शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांत आम्हाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. लोकशाही व्यवस्थेत जाट आणि मराठा यांचे आत्मबल, निर्भयता आणि एकता हेच शस्त्र आहे. या ताकदीवर आपण आरक्षण प्राप्त करू.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.