पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ
धुळे : खरा पंचनामा
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
