Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोड्या करणाऱ्या अट्टल दोन चोरट्यांना अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई

घरफोड्या करणाऱ्या अट्टल दोन चोरट्यांना अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरात घरफोडी तसेच गॅरेज फोडणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

आकाश श्रीकांत खांडेकर (वय २२, रा. सांगलीवाडी), गणेश उत्तम संकपाळ (वय २२, रा. गावभाग, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २७ जून रोजी फौजदार गल्लीतील नीरज सुरेंद्रनाथ यांचे घर फोडून ऐवज लंपास करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक संशयितांचा शोध घेत होते. 

या गुन्ह्याचा तपास करताना पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यानंतर आकाश खांडेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गणेश संकपाळ याच्या मदतीने फौजदार गल्लीतील एक घर फोडून त्यातील लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली. तसेच एक गॅरेज फोडून त्यातील साहित्य लंपास केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.