Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवयव रुपी दागिने जाळू नका, दान करा डॉ. हेमा चौधरी यांचे आवाहन

अवयव रुपी दागिने जाळू नका, दान करा
डॉ. हेमा चौधरी यांचे आवाहन



सांगली : खरा पंचनामा

मयत व्यक्तीचे मृत्यूनंतर त्याचे नातेवाईकही असे दान करू शकतात. त्वचा दानामुळे अनेक भाजलेल्या रुग्णांना जीवनदान मिळू शकते. मेंदू मृत अवयव दानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. आपली प्रिय व्यक्ती अवयवाच्या माध्यमातून जगावी अशी आशा करणाऱ्यांना अवयवदान निश्चीत करावे. अवयव हे दागिने आहेत, ते जाळू नका तर दान करा असे आवाहन दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या जिल्हा समन्वयक डॉ. हेमा चौधरी यांनी केले. 

मिरजेतील ज्येष्ठ नागरिक संघ येथे आयोजित कायर्क्रमात नेत्रदान, देहदान, अवयव दान, त्वचा दान या विषयावर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मृत्यूनंतर केलेल्या नेत्रदान, त्वचा दान, अवयव दान यामुळे अनेकांचे जीवन गुलजार  बनते. आज अनेक लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचा दान तसेच देहदान अशा प्रकारचे दान कुणीही करू शकते. म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा जरूर विचार करावा. सद्य परिस्थितीत जनजागृतीमुळे अनेक नागरिकांचा कल देहदानाकडे व नेत्रदानाकडे वाढत आहे. परंतु यात अजून वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही केंव्हाही मार्गदर्शनासाठी तयार आहोत, असेही डॉ. हेमा चौधरी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. जिते जिते रक्तदान, जाते जाते अंगदान और जाने के बाद नेत्रदान, त्वचांदान व देहदान! असा मंत्रही यावेळी देण्यात आला. 

मिरज येथील निसर्ग संवादचे राजेंद्र जोशी, युवराज मगदूम यावेळी उपस्थित होते. तसेच फेडरेशनच्या पद्मजा माने आणि सीमा चौगुले उपस्थित होत्या. सूत्रसंचलन सुबोध भोकरे यांनी केले. यावेळी उपस्थितानी देहदानाचे व अवयवदानाचे फॉर्म भरून दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.