Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुणरत्न सदावर्तेकडून आजपासून एसटी बंदचा इशारा, पण राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत

गुणरत्न सदावर्तेकडून आजपासून एसटी बंदचा इशारा, पण राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत



मुंबई : खरा पंचनामा

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी- - कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय.

राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आगे कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत. माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे, पाटोदा, दिग्रस, हिंगोली, आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे.

जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे, पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार, कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने 6 नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 250 आगारातील सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.