जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अन्यथा तीव्र आंदोलन
सांगली : खरा पंचनामा
बेडग येथील मराठा उपोषणकर्त्यांचा अपमान करणारे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा तर्फे सर्व लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
मारुती चौक येथील आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत बेमुदत उपोषणास अजित जगताप बसले होते. त्यांचे उपोषण सरबत देऊन पाठिंबा द्यायला आलेल्या केमिस्ट असोसिएशनच्या संचालकांच्या यांच्या हस्ते सोडवण्यात आले. मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला पाठिंबा दर्शवत साखळी उपोषण, सरकारचा अंत्यविधी, सार्वजनिक माती लोटण्याचा, सामूहिक मुंडन आणि उत्तरकार्यविधीचा आंदोलनाचा जो टप्पा होता तो स्थगित करण्यात आलेला आहे.
डॉ. संजय पाटील, विलास देसाई, शंभूराज काटकर, सतीश साकळकर, श्रीकांत शिंदे, नितीन चौगुले, कॉम्रेड उमेश देशमुख, संतोष माने, नितीन चव्हाण, विश्वजीत पाटील, तानाजी भोसले, अक्षय मिसाळ, अमोल चव्हाण, रोहित पाटील, गजानन साळुंखे, संभाजीराव पोळ, संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.