Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कडेगावात ४० हजारांची लाच घेताना नायब तहसिलदारास अटक सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कडेगावात ४० हजारांची लाच घेताना नायब तहसिलदारास अटक
सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

विकलेल्या जमिनीची एनएची आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदारास अटक करण्यात आली. कडेगाव येथे सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

सुनील जोतिराम चव्हाण (वय ५०) असे अटक केलेल्या नायब तहसिलदाराचे नाव आहे. तक्रारदाराने त्याच्या जमिनीची विक्री केली होती. त्या जमिनीची एनएची आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्यासाठी चव्हाण याने तक्रारदाराकडे ४५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.  

त्या तक्रारीनुसार त्याची पडताळणी केल्यानंतर चव्हाण याने सुरुवातीला ४५ हजार रूपये लाचेची मागणी करून नंतर तडजोडीअंती ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी कडेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात ४० हजारांची लाच घेताना चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांकडून लाचेची मागणी झाल्यास 9821880737 या क्रमांकावर संपकर् साधण्याचे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. 

पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सीमा माने, वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.