Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट दारूचे तीन अड्डे उत्पादन शुल्ककडून उदध्वस्त; पाचजणांना अटक

बनावट दारूचे तीन अड्डे उत्पादन शुल्ककडून उदध्वस्त; पाचजणांना अटक



कराड : खरा पंचनामा

तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूचे अड्डे उध्वस्त केले. कराड व साताऱ्याच्या भरारी पथकाने जुळेवाडी, रेठरे बुद्रुक व मलकापूर येथील अड्ड्यांवर छापे टाकले. त्यात तिन्ही छाप्यात तब्बल २० लाखांची बनावट दारू जप्त केली आहे. त्यात पाच जणांना अटक केली आहे. 

फैय्याज मुसा मुल्ला (वय ५३, रा. मलकापूर), शेखर गुणवंत बनसोडे (५०), आयाज आबू मुल्ला (५३) व इर्शाद उर्फ बारक्या शहाबुध्द्दीन मुल्ला (३४, तिघे रा. रेठरे बुद्रूक) व रोहित रमेश सोळवंडे (२६, रा. कुंडल, ता. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उत्पादन शुल्कचे सातारा व कराडच्या भरारी पथकाने विभागाने रविवारी (ता. पाच) जुळेवाडी परिसरात रोहित सोळवंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट दारुची वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडून बनावट देशी दारुचा साठा व चारचाकी वाहनासह वाहनांसह एक लाख ९४ लाखांचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला. संशयीत सोळवंडे यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी बनावट दारू अड्ड्यांची माहिती भरारी पथकाला मिळाली.

त्यानुसार भरारी पथकाने आज तिन्ही ठिकाणी कारवाई करत तिन्ही अड्डे उध्वस्त केले. जुळेवाडी येथील देशी दारु दुकानाच्या पाठीमागे छापा टाकण्यात आला. तेथे फैय्याज मुल्ला, शेखर बनसोडे यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बनावट दारुसाठा तसेच चारचाकी वाहनासह एकूण एक लाख ४० हजार ४८० रूपयांचा मुददेमाल जप्त केला. तिन्ही संशयीतांना सोबत घेवून मलकापूर येथे ग्रीन लँड हॉटेल मागे व रेठरे बुद्रूक येथील कॅनॉल चौकी परिसरातील मुलानकी नावाच्या शिवारात छापे टाकण्यात आले.

तेथे आयाज मुल्ला व इर्शाद उर्फ बारक्या मुल्ला यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बनावट दारुचा साठा बनावट दारु र्निर्मितीचे साहित्य, कॅप सिलींग मशीन, बनावट लेबले, बनावट बुचे व असे साहित्य जप्त करण्यात आले. तिन्ही छाप्यात तब्बल १९ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, शरद नरळे, प्रशांत नागरगोजे सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.