Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोणत्या फॉर्म्युल्याने मराठा आरक्षण मिळणार? फडणवीस यांच्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

कोणत्या फॉर्म्युल्याने मराठा आरक्षण मिळणार?
फडणवीस यांच्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 



कोल्हापूर : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने वेगाने प्रक्रिया सुरू केली आहे.

पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ही शंका व्यक्त केली जात असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी जुलै 2014 मध्ये मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिलं होतं. नव्या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिलं त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या राजकारणाबाबत मला कोणी काय आरोप केला याविषयी बोलायचं नाही. स्वातंत्र्यानंतर या आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी हा प्रश्न हाताळला होता. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला होता. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. यामध्ये मराठा समाजाला क्रिमिलियरची अट टाकून 2014 मध्ये 16 टक्के आरक्षण दिले आणि मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा 50 जाती शोधून 5 टक्के आरक्षण त्याकाळी दिले होते, असं सांगतानाच आमचं सरकार पाडण्यात आलं आणि हे आरक्षण टिकू शकल नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत 16 टक्केच्या ऐवजी 12 टक्के आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र ती निव्वळ फसवणूक होती, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, असं ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.