Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा

अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना बीड दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अंतरवालीतील हल्ल्यामागे षडयंत्र आहे. त्यामुळे अंतरवालीच्या हल्ल्याची SIT चौकशी करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली.

'आता काही जण शांततेत आंदोलन करीत आहेत, त्यांना अडकवले जात आहेत. त्यात आता आम्ही आमचं आरक्षण मागत आहेत. आमचंच आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत, असे ते म्हणाले. 

'अंतरवालीत आधी पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला', या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, 'आता ते षडयंत्र आहे, हे जनतेने समजले आहे. कारण त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करा. लाठीहल्ल्याची चौकशी करा. त्यावेळी पोलिसांवर दडपण होतं का, १५ दिवस आधीच्या चौकशी करा. सर्व पोलिसांची उच्चस्तरीय चर्चा करा. आरोप चुकीचा ठरला तर आरोप करण्यावर काय कराल? असा सवालही जरांगे यांनी केला.

'मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ते आम्ही मिळवणारच. दबावाखाली प्रमाणपत्र मिळत नाहीये. हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. आमचं घर हरवलं, त्याच्या नोंदी आता सापडल्या आहेत. ओबीसी बांधव हे मराठा बांधवाविरोधात बोलणार नाहीत. ओबीसी बांधवांना जाणीव आहे की, त्यांना गोरगरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, असेही ते म्हणाले.

'ओबीसी बांधवांर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्याकडे कोणी गेलं नाही. आमच्या नोंदी सापडत असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काही हरकत नसावी. संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्याचं समर्थन केलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.