Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार परत येणार नाहीत! 'अनेकांच्या 'फाईल' तयार'

अजित पवार परत येणार नाहीत! 'अनेकांच्या 'फाईल' तयार'



नागपूर : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या 'फाईल' तयार असल्याने ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येतील याची शक्यता वाटत नसल्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर सर्वांच्याच मनात शंका होती. शरद पवार यांचीची ही खेळी असल्याचे बोलले जात होते. तसे दावेही केले जात होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना सोडून जातील यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती होती.

आमच्याही मनात शंका होती. शरद पवार यांच्या रोखठोक भूमिकेमुळे संशयाचे मळभ दूर झाले आहे. भाजपच्या महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता परत येतील याती सुतरान शक्यता दिसत नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीत फूट पडली आहे हे स्पष्ट आहे. नेते विखुरल्या गेले हेसुद्धा तितकेच खरे आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत फक्त नेते गेले आहेत, तळागाळातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच आहे. हेच कार्यकर्ते शरद पवार यांची ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसेल असे दिसत नाही. शरद पवार यांनी पावसात घेतलेल्या सभेने महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे पालटले होते हे सर्वांनाच ठावूक आहेत याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.