Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही'

'जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही'कर्जत : खरा पंचनामा

आज कर्जत येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, 'पक्ष सत्तेत आला तेव्हा प्रकाश सोळंखे नाराज होते. सरकारमध्ये घेत नाही म्हणून ते राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा मी आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंखे यांना तुम्ही कार्याध्यक्ष व्हा आणि नंतर प्रांत अध्यक्ष करु, असा शब्द दिला होता. मात्र जयंत पाटील यांनी शब्द देऊन एक वर्ष झालं तरी सोळंके यांना पद दिल नाही. आपण एखाद्याला शब्द दिला की तो पाळला गेला पाहिजे ना?" असं म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, अजित पवार यांनी पक्षातील व्यवस्थेवर भाष्य केलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला. अजित पवारांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यांनी यावेळी आगामी लोकसभा निवडणूका, समान नागरी कायदा आणि जातनिहाय जनगणनेविषयी भाष्य केले, दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेतला टोला लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.