संरक्षण क्षेत्राला स्फोटकं पुरविणाऱ्या कंपनीतील स्फोटात नऊ जणांचा मृत्यू
नागपूर : खरा पंचनामा
नागपुरातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. सोलर एक्सप्लोसिव्ह बाजारगाव कंपनीच्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण स्फोटात सोलर कंपनीच्या सीबीएच 2 युनिटमध्ये घटना घडली आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटानंतर राज्य सरकारकडून मृताच्या वारसांना ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
