Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार; पोलीस जखमी

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार; पोलीस जखमी



अकोला : खरा पंचनामा

अकोला जिल्हा येथील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्रीच्या वेळेस पोलिस पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन पेट्रोलिंग करताना पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून. गोळीबार केल्यानंतर दरोडेखोर हे फरार झाले आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या भागात रात्रीच्या वेळी पोलिस कर्मचारी हे गस्त घालत होते. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्ती यांनी पोलिस कर्मचारी यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नसून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर त्याच्यावर उरळ येथील पीएससीमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्यावर उरळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गोळीबार करून हल्लेखोर हे फरार झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.