महाविकास आघाडी अशी पडेल की, पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही
सांगली : खरा पंचनामा
लांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान असावा. कारण दर महिन्याला ते सरकार पडणार असे म्हणतात, पण अजून काही पडले नाही. आता १० जानेवारी म्हणत आहेत, पण १० जानेवारीनंतर हे सरकार पडणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल की, पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही, अशी जोरदार टीका संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्याचे संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सांगली येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जानेवारीत सरकार पडणार या विधानावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. यावरून निशाणा साधताना मुनगंटीवार यांनी संजय राऊत हे अप्रत्यक्ष नरेंद्र मोदींना मदत करत आहेत. पण राहुल गांधींचे नाव घेतल्यावर भाजपलाच मतदान होतं, हे ममता बॅनर्जीना देखील कळलं. त्यामुळे ते राहुल गांधींच्या मागे गेल्या नाहीत, असा टोला मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
सुप्रिया सुळे आता दहा महिने मतदार संघातच थांबणार आहेत व त्यांच्या विधानाचाही सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे. कदाचित त्यांना धोका कळला असेल, त्यामुळे जान बची तो लाखो पाय आणि मतदार संघात काही गडबड झाली तर लोक देशाचे नेतृत्व कसं करता येणार. यामुळे सुप्रिया सुळे मतदार संघात थांबणार आहेत. त्यांना आपल्या खूप शुभेच्छा आहेत, बारामतीची लोकसभेची निवडणूक आम्ही खूप कमी अंतराने जिंकू असं विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.