Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत भीमनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रारंभ लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांचे विशेष प्रयत्न

सांगलीत भीमनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रारंभ
लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांचे विशेष प्रयत्नसांगली : खरा पंचनामा

सांगलीतील प्रभाग क्र. १० मधील भीमनगर आणि गोकुळनगर येते काँग्रेसचे नेते, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळे यांच्या विशेष प्रयत्नांतून रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन भागातील ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते करण्यात आले. 


काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस आणि  सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आजपर्यंत विध्यार्थाना शालेय साहित्य वाटप, जनावरांना चारा, पाणी तसेच कोव्हिडं काळात किट वाटप करण्यात आले आहे. तसेच भागातील नागरिकांच्या मागणी नुसार आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक मासाळे यांच्या विशेष प्रयत्नाने भीमनगर आणि गोकुळ नगर परिसरात काँक्रीटकरण रस्त्याचे उदघाटन भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी अशोक मासाळे यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले. यावेळी सचिन आरवाळे, विनायक हेगडे, अशोक इंगळे, नितीन ठोकळे, राजू माने, मच्छिंद्र माने, पृथ्वीराज माळगे, यल्लाप्पा गोल्हार, राजेंद्र पाटील, नवीनछंद मोरखाने, मुपीत कोळेकर, राकेश शिंगे, लिंगा कांबळे, अतुल कांबळे, अजित कांबळे आणि प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिक उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.