Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना बोचरा सवाल

अजितदादांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का?
सुषमा अंधारेंचा फडणवीसांना बोचरा सवाल



मुंबई : खरा पंचनामा

जामिनावर असलेले नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला. राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्या पत्रानंतर खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर बोचरा वार केला आहे. सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठं गेला होता, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

नवाब मलिक यांच्या अजितदादा गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्रजींनी एक पत्र दादांना लिहिल्याचे समजते, ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांना सामावून घेऊ नये असे सांगितले आहे. सगळ्यात गमतीदार भाग आहे, दिवसभरातल्या एकूण घडामोडी पाहता, ज्या पद्धतीने देवेंद्रजी ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही. त्यानंतर त्यांनाही उपरती आली आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असेही म्हणत आहेत. परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आतापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले, त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेक कुठे गेला होता?

सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवेंद्रजी आपण ज्या अजितदादांना पत्र लिहीत आहात, त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता.

एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजित दादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल एवढा प्रश्न आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.