Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली पोलिसांचे पथक बिहारला, सुबोध सिंगच्या गावात करणार तपास कोठडीत कसून चौकशी : रिलायंस ज्वेल्स दरोडा प्रकरण

सांगली पोलिसांचे पथक बिहारला, सुबोध सिंगच्या गावात करणार तपास 
कोठडीत कसून चौकशी : रिलायंस ज्वेल्स दरोडा प्रकरण



सांगली : खरा पंचनामा 

मार्केट यार्ड परिसरातील ‘रिलायन्स ज्वेल्स’ या सराफी शोरूमवरील दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार सुबोध सिंग ईश्‍वर प्रसाद सिंग (रा. चिश्‍तीपुर, थाना - चंडी, जि. नालंदा, बिहार) याला अटक करण्यात आली आहे. तो पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्याने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी विश्रामबाग आणि एलसीबीचे संयुक्त पथक बिहारला पाठवन्यात आले आहे. तसेच सुबोध सिंग याच्या चिश्‍तीपुर हा गावाही चौकशी, तपास केला जाणार आहे.  

जूनमध्ये मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स दुकानावर नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून पावणे सात कोटींचे दागिने घेऊन पलायन केले होते. पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी दरोडा टाकल्याने याप्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली.
त्यानंतर पोलिस दल खडबडून जागे झाले. 

तपासात गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार, कुख्यात दरोडेखोर सुबोध सिंग याचे नाव समोर आले. तो सध्या पाटणा येथील आदर्श सेंट्रल जेलमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. तेथील पोलिसांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसापुर्वी त्याला अटक करण्यात आली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. विशेष कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात आहेत. पहिल्या दिवशी त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही. त्यानंतर आता तो सारी माहिती पोलिसांना देत आहे. 

त्याने दिलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांचे संयुक्त पथक बिहारला रवाना करण्यात आले आहे. त्याच्या अन्य साथीदारांचाही यावेळी माग घेतला जाणार आहे. त्याच्या मुळ गावीही चौकशी केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.