Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्यधुंद पोलिस उपायुक्ताने 3 जणांना उडवलं; ताबा सुटल्याने कार खड्ड्यात

मद्यधुंद पोलिस उपायुक्ताने 3 जणांना उडवलं; ताबा सुटल्याने कार खड्ड्यात



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

नाशिक सीआयडी येथे पोलिस अधीक्षक असलेले आणि पूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत शुक्रवारी (दि.19) तिघांच्या अंगावर एसयूव्ही गाडी (एमएच 15 एचएम 9952) घातली. यामध्ये कुलगुरुंच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षक आणि बुलढाण्यावरुन पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने मागील दीड महिन्यात तीन वेळा अशा प्रकराचा अपघात केला आहे.

दिपक गिन्हे असे या पोलीस उपायुक्तांचे नाव आहे. गिन्हे हे पूर्वी संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. त्यानंतर त्यांची मुदतपूर्व नाशिक सीआयडीमध्ये पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली. गिन्हे शहराकडे निघाले असताना हा अपघात झाला. त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यात कोसळल्याने लोकांनी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोगाबाबा टेकडी जवळ हा अपघात झाला आहे. दीपक गिन्हे हे गोगाबाबा टेकडी वरून खाली येत होते. त्यावेळी त्यांच्या कारने दोन जणांना धक्का दिला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले. तरुणांनी गिऱ्हे यांच्या गाडीचा पाठलाग करत कारवर दगडफेक केल्याने नशेत तर्र असलेल्या उपायुक्तांची गाडी थेट खड्ड्यात गेली. सोशल मीडियावर तरुणांना विनवण्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

कार खड्ड्यात जाताच तरुणांनी दीपक गिन्हे यांना घेरले. जमाव जमत असल्याने त्यांनी ओळख दाखवत मित्रांनो मला दोन मुली आहेत. सॉरी बाबा... मला असं अपमानीत करु नका... प्लीज यांना जायला सांगा... अशा विनवण्या करताना व्हिडिओत दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.