Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलीस दलातील 5 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबचे आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेले अधिकारी :
श्रवण दत्त (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नंदूरबार), पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक नंदूरबार ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे), अविनाश एम बरगळ (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती), बच्चन सिंग (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, अकोला), चेतना शेखर तिडके (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई).

पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे  यांची बदली करण्यात असून त्याच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. तसेच अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई पंकज कुमावत (पदोन्नतीने) यांचे सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.