Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार

आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला
नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार



जालना : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असून, आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला येत आहे.

ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला ते आंतरवाली सराटी गावातून पायी दिंडी काढणार आहे. त्यांच्या याच आंदोलनामुळे सरकारची अडचण वाढू शकते. त्यामुळे, सरकारकडून 20 जानेवारीला सुरु होणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. काल बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेऊन, अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी जरांगे यांनी काही दुरूस्ती करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आज सरकारच एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीत काही मार्ग निघतो का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.