Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरेंचे आमदार पात्र कसे? याचिकेवर सुनावणी सुरू नार्वेकरांना हायकोर्टाची नोटीस

ठाकरेंचे आमदार पात्र कसे? याचिकेवर सुनावणी सुरू
नार्वेकरांना हायकोर्टाची नोटीस



मुंबई : खरा पंचनामा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतरही अद्याप तिढा सुटलेला नाही. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले. यात ठाकरे गटाचे आमदार पात्र का ठरवले? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुनावणी सुरू असून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या १४ याचिकांवर तातडीने सुनावणी केली जात आहे. शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही ?, तो न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा अशी मागणी शिंदे गटाने याचिकेत केली आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, पक्षाचे मुख्य व्हिप असलेले भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेताना विधानसभा अध्यक्ष आणि UBT शिवसेना नेत्यांना नोटीस बजावली आहे. भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरींविरोधात याचिका दाखल करण्यात आलीय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.