Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन लाखांची लाच घेताना एपीआय लाचलुचपतच्या जाळ्यात!

दोन लाखांची लाच घेताना एपीआय लाचलुचपतच्या जाळ्यात!



भिवंडी : खरा पंचनामा

नारपोली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपये लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.30) सकाळी नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. एपीआय शरद पवार यांनी पाच लाख रुपये लाच मागून दोन लाख रुपये लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यांना रंगेहाथ पकडले. 

मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षाच्या योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाचा खून करुन मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 7 डिसेंबर रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुनह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत आहेत.

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी व कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पवार याने अनिकेतच्या आईकडे पाच लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर तडजोडी अंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर महिलेने ठाणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता एपीआय शरद पवार यांनी पाच लाख रुपये लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. मंगळवारी (दि.30) सकाळी नारपोली पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. एपीआय शरद पवार यांना महिलेकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.