Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पोलिस बदल्यांना मुदतवाढ

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पोलिस बदल्यांना मुदतवाढ



मुंबई : खरा पंचनामा

यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिलेल्या सूचनांनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना पोलिस विभागाने मागवल्या होत्या. त्या अद्याप प्राप्त झाल्या नसल्याने पोलिसांच्या बदल्याना मुदतवाढ देण्यात आली आहे. आस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने या सूचनांची पत्रे सर्व पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना सोमवारी पाठवण्यात आली आहेत. 

सर्व संबंधित घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या सूचना, निर्देशानुसार कार्यवाही करावी असे सिंघल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदली, पदस्थापनेबाबत पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावरील कार्यवाही दि. ९ जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती त्यासाठी आता १२ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परिक्षेत्रीय स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबतची कार्यवाहीसाठी दि. १२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यांच्या स्तरावरील बदल्या करण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबत दि. १२ जानेवारीपर्यंत कार्यवाही करायची होती. त्यासाठी आता १६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.