Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा



बारामती : खरा पंचनामा

बारामतीत यापूर्वी कार्यरत असणाऱ्या आणि सध्या पुणे मुख्यालयात कार्यरत असलेल्या दशरथ नामदेव कोळेकर (वय ४०, रा. एमआयडीसी, बारामती) या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली. ती बारामती शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, बारामती शहरातील अशोकनगर भागात ही तरुणी राहत होती. कोळेकर यांनी तिला केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तिला मारहाण केली. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून ही तरुणी बारामतीतून पुणे येथे निघून गेली असता कोळेकर याने तिच्या बहिणीला फोन व मेसेज करत आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बारामतीत यापूर्वीही अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना आहे. दरम्यान कोळेकर याच्याविरुद्ध दाखल गुन्हा आंबेगाव पठार येथून बारामती शहर पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.