Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळचा तथाकथित शिक्षणसम्राट मोहन माळीला अटक स्वतःच्या कार्यालयातील तरूणीचा विनयभंग, अॅट्रौसिटीचाही गुन्हा

कवठेमहांकाळचा तथाकथित शिक्षणसम्राट मोहन माळीला अटक
स्वतःच्या कार्यालयातील तरूणीचा विनयभंग, अॅट्रौसिटीचाही गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

कवठेमहांकाळ तालुक्यातील तथाकथित शिक्षणसम्राटाला तरूणीच्या विनयभंग तसेच जातीवरून अपमान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या घटनेमुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोहन माळी असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. पीडिता संशयित माळी याच्या कवठेमहांकाळ येथील एका कार्यालयात काम करते. दि. ८ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान संशयित माळी याने पीडित तरूणीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले. तसेच या काळात सतत तिला अश्लील हावभाव करून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तिचा तिच्या जातीवरूनही अपमान केला. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी पीडितेने धाडस करून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.