Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्तांचा बाप लागू करतो : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्तांचा बाप लागू करतो : उपमुख्यमंत्री अजित पवारकल्याण : खरा पंचनामा

कल्याण मध्ये आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे. यामध्ये अजित पवार यांनी असे बोलले की मुख्यमंत्री एकदा आदेश देतो तर आयुक्तांच्या बाप लागू करतो हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कल्याण ग्रामीण परिसरातील वरप भागात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरभरात बॅनर लागले होते, जागोजागी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

कार्यकर्त्यांनी अजित पवारांना ठीक ठिकाणी भेटून समस्या मांडल्या. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील मागण्या अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे, यावेळी कर्मचाऱ्यांनी अद्याप निर्णय आयुक्तांनी लागू केला नसल्याचे सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी जेव्हा मुख्यमंत्री आदेश देतात, त्यावेळी आयुक्तांचा बाप लागू करतो बाप असे सुनावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.