Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

८ लाखांमुळे 'वर' झालेली 'राजा'ची 'मान' होणार खाली! सम्राटाचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे

८ लाखांमुळे 'वर' झालेली 'राजा'ची 'मान' होणार खाली!
सम्राटाचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हेसांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यात सध्या एका सम्राटाचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात म्हणे नेहमीच 'मान' 'वर' असलेल्या 'राजा'ने ८ लाखांची तोडपाणी केल्याची चर्चा आहे. मात्र तत्कालीन वरीष्ठांनी या राजाचा गोपनीय अहवाल वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला असून आता या सम्राटाकडून घेतलेली मलईची माहितीही वरीष्ठांच्या कानावर गेली आहे. त्यामुळे ८ लाखांमुळे या 'राजा'ची 'वर' झालेली 'मान' लवकरच खाली होईल अशी त्यांच्या विभागात चर्चा आहे. सम्राटाचे हे प्रकरण त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील एका तथाकथित सम्राटाचे कारनामे मंगळवारपासून चांगलेच चर्चेत आहेत. हा सम्राटच आता अडचणीत आल्याने त्याला अनेक प्रकरणात मदत करणाऱ्या खात्यातील 'वर' 'मान' असलेल्या 'राजा'ची चांगलीच गोची झाली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांची फसवणूक करणारा अशी या 'राजा'ची ख्याती आहे. शिवाय म्हणे दुष्काळी टापूतील तीन तालुक्यांचा हा अनभिषिक्त 'राजा' असल्याचे खुद्द त्याच्याच खात्यात बोलले जाते. पण या राजाला काही दिवसांपूर्वी म्हणे चोरट्यांनीही चांगलाच दणका दिल्याचीही चर्चा आहे. 

चोरट्यांच्या दणक्याने आपली अब्रु वेशीवर टांगली जाऊ नये यासाठी याने चोरी होऊनही मूग गिळल्याचे बोलले जाते. त्यातच आता सम्राटाकडून घेतलेल्या मलईची चर्चा सुरू झाल्याने हा 'राजा' चांगलाच अस्वस्थ झाला आहे. दरम्यान डॉक्टरांपयर्त त्याचे कारनामे पोहोचले असून त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार त्याच्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा राजा खात्यातून निलंबित होईल अशीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.